Visarjan

अत्यंत मंगल मय् अशा 10 दिवसाच्या पवित्र वातावरणानतर सुरु होतो अनन्त  चतूर्दशीला विसर्जन

Ganpati Procession in Palkhi

सोहळा. पाहाटे 5 वाजता काकडा आरती ने सुरू  होते मंगल मय् दिवसाची सुरूवात. 9 वाजता सर्व ग्राम देवताना नेव्‍यद्य दाखवला जातो. लगेच महापंगत सुरु होते. साधारणता 70 ते 80 क्विंटाल तांदळाचा भात केला जातो. सोबत ऋचकर वरण असते.





             


2 वाजता मंगल मूर्ती विसर्जन साठी सजवलेल्या पालखीत विराजमान होते. सुरूवात होतो विसर्जन सोहळा. प्रतेक दारावर, पालखि समोर नारळ फोडला जातो. ही मीरवणूक साधारण 20 ते 25 तास चालते.
पाळज गावातील मूळ रहिवाशी, जेथे कोठे आसतिल तेथुन ह्या दिवशी पाळज ला आवर्जुन उपस्थित रहातात.





नदी तिरावार शेवट ची आरती होते. दुसरी लहान मूर्ति विसर्जित केली जाते. गणपती वर शाल झाकली जाते. परत मंदिरात मूर्ती आनलि जाते. कपाटात ठेवलि जाते. पुढिल गणेश चतुर्थी ला पुन्हा प्राणप्रतिष्टा केली जाते.
नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असल्यामुळे अकरा दिवस या गावाला यात्रेचे स्वरूप येते. आंध्र प्रदेशसह महाराष्ट्रातून भाविक  मोठ्या भक्तिभावाने इथे  दर्शनासाठी येतात. शेवटचे तीन दिवस एक लाख भाविक जमतात.  दर्शनासाठी येणा-या  भाविकांची गैरसोय  होऊ नये म्हणून पाळज येथील नागरिक संघटितपणे परिश्रम घेऊन भाविकांची सोय करतात.   
आरती
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची ।। नुरवी, पुरवी प्रेम कृपा जयाची।।
सर्वांग सुंदर उटी शेंदुराची ।। कंठी झळके माळ मुक्ता फळाची।।
जयदेव जयदेव जय मंगलमुर्ती ।। दर्शनमात्रे मन कामना पुरती ।। १ ।।
रत्नखचित फरा तुज गौरी कुमरा ।। चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।।
हिरे जडीत मुकुट शोभतो बरा ।। रुणझुणती नुपुरे चरणी घागरीया ।।
जयदेव जयदेव जय मंगलमुर्ती ।। दर्शनमात्रे मन कामना पुरती ।। २ ।।
लंबोदर पितांबर फणिवर वंधना ।। सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।।
दास रामाचा वाट पाहे सदना ।। संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना ।।
जयदेव जयदेव जय श्री मंगलमुर्ती ।। दर्शनमात्रे मन कामना पुरती ।। ३ ।।
ஜ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬▬▬▬▬●ஜ
(¯*•๑۩۞۩:♥♥ ||गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ती मोरया||♥♥ :۩۞۩๑•*¯)
ஜ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬▬▬▬●ஜ

No comments:

Post a Comment